पावसाने राज्यातील २० लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त; नांदेड- वाशिम जिल्हे सर्वाधिक नुकसान !

नांदेड ,एपीएमसी न्यूज नेटवर्क: राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास २० लाख १२ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज त्यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नांदेड व वाशिम जिल्ह्यांवर या आपत्तीचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून पुढील आठ दिवसांत अहवाल शासनाला प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले.