“मुंबई APMC मध्ये काँक्रीट रस्ते निविदा घोटाळा थेट सुप्रीम कोर्टात – 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश!”

मुंबई APMC मधील ४० कोटींच्या काँक्रीट घोटाळ्यावरचा सुप्रीम कोर्टाचा थेट हस्तक्षेप
मुंबई .एपीएमसी न्यूज नेटवर्क : मुंबई APMC मधून एक मोठी बातमी समोर येत आहे , धान्य मार्केटमधील तब्बल ४० कोटी रुपयांच्या रस्ते काँक्रीटकरण कामात निविदा प्रक्रियामध्ये मोठ्या घोटाळ्याचा आरोप… आणि हा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे!
-याचिकाकर्ता अनिल तिवारी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, या निविदेत अपात्र ठेकेदारांना काम, कागदपत्रांमध्ये फेरफार, पात्र ठेकेदारांना प्रक्रियेतून बाहेर ढकलणे… असे गंभीर आरोप आहेत. यामध्ये मुंबई APMC चे सभापती, सचिव, तीन अभियंते आणि ठेकेदार यांचा थेट सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.
सुप्रीम कोर्टाची कारवाई:
1 ऑगस्टला झालेल्या सुनावणीत, सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण दखल घेतलं असून, ४ आठवड्यांत निविदा प्रक्रियेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे.
याचिकेत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची, ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पणन विभाग आता एक्शन मोडवर असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सह-निबंधकांकडून चौकशी सुरू करण्याची हालचाली सुरू केली आहे .
या प्रकरणी पणन मंत्री, पणन सचिव आणि पणन संचालक सुप्रीम कोर्टात काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बाजारघाटकांकडून तर संचालक मंडळ बरखास्त करून अभ्यासू प्रशासक नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.