शेतकरी-व्यापाऱ्यांना न पाहता टक्केवारीसाठी धडपड; मुदतवाढ मिळवण्यासाठी मुंबई APMC तील काँग्रेसचे तिन्ही संचालक अजितदादांच्या चरणी!

हिंगणघाट,एपीएमसी न्यूज नेटवर्क: मुंबई एपीएमसी संचालक मंडळाचा कार्यकाल ३१ ऑगस्टला संपत असताना, मुदतवाढीसाठी काँग्रेसचे तिन्ही विद्यमान संचालक हुकूमचंद आमदारे, प्रवीण देशमुख आणि धनंजय वाडकर थेट हिंगणघाटात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या कार्यक्रमात हजर राहिले.
मागील काही दिवस हे तिन्ही संचालक मुंबई एपीएमसीच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करून विविध मंत्र्यांकडे फेऱ्या मारत असल्याची चर्चा होती. मात्र अपेक्षित दिलासा न मिळाल्याने, अजितदादा पवार हिंगणघाट बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाला येणार असल्याची माहिती मिळताच, हे संचालक थेट कार्यक्रमात पोहोचले.
बाजार आवारातील चर्चा!
“आपल्याला फायदा कसा होईल, बाजार समितीची तिजोरी कशी रिकामी करायची, ८५ कोटींच्या कामांतून टक्केवारी कशी मिळवायची यासाठीच ही धडपड सुरू आहे.”
संचालक मंडळचे पाच वर्षांच्या कार्यकाळात
शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणे,मार्केटमधील अनधिकृत शेतमाल व्यापार रोखणे,बाजार समितीच्या उत्पन कसे वाढणार ,जवळपास १५० कोटी रुपयांचे प्रकल्प पाच वर्षापासून बांधून धुळखात पडले आहे त्याच्या विक्री तून बाजार समिती उत्पन्न वाढी बाबत काय उपाययोजना करता येईल 
या मूलभूत गोष्टींकडे मंडळाने पूर्णपणे पाठ फिरवली. उलट रस्ते काँक्रिटीकरण, कांदा-बटाटा व मसाला मार्केट पुनर्विकास आणि मालमत्ता विक्रीतून टक्केवारी मिळवणे हाच मुख्य अजेंडा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उद्घाटन कार्यक्रमात अजितदादा पवार यांच्यासह बाळासाहेब सोळसकर, सभापती सुधीर कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असूनही संचालक मंडळातील तिन्ही जण राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या मंचावर हजेरी लावताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
“एकीकडे महायुतीवर टिक्का, तर दुसरीकडे अजितदादांच्या कार्यकमात हजेरी – ही काँग्रेस संचालकांची राजकीय दोलायमान भूमिका शेतकरी-व्यापाऱ्यांच्या हितापेक्षा स्वतःच्या फायद्यासाठीच आहे,” अशी चर्चा बाजार आवारात रंगली आहे.
पणन मंत्री म्हणतात की बाजार समित्या शिस्तबद्ध करू, परंतु प्रत्यक्षात प्रशासन व संचालक स्वतःच्या फायद्यासाठीच कारस्थान रचत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे मंडळ बरखास्त करून सक्षम प्रशासक नेमावा, अशी मागणी बाजार घटकांकडून जोर धरत आहे.