मुंबई APMC मार्केट संचालकांच्या ‘भाजीपाला’ बाजार! मार्केटमध्ये अनधिकृत व्यापाराचा सुळसुळाट
-वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि उघडपणे बेकायदेशीर व्यापार
-वर्षानुवर्षे मार्केटमध्ये ठाण मांडून बसलेले   काही सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण गैरव्यवहार फोफावला आहे.
-मार्केटमधील 60% व्यापार बेकायदेशीर दिवसाला लाखोंची वसुली — सुरक्षा अधिकारी व काही व्यापाऱ्यांच्या नेक्ससमुळे अवैध कारभार फोफावला
-अनधिकृत व्यापारामुळे मार्केट समितीचा महसूल कोसळतो,शेतकऱ्यांची फसवणूक वाढते,प्रामाणिक व्यापाऱ्यांवर मानसिक व आर्थिक दबाव येतो, बाजारातून हद्दपार करण्याचे प्रकार वाढतात
-फुटपाथ, पॅसेजमध्ये गॅस सिलिंडरचा वापर घाण, दुर्गंधी आणि शेतमाल वाहतूकदारांना प्रचंड त्रास
-काही ठराविक व्यापारी   सुरक्षा अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे व्यवसायिक कायद्याला सरळसरळ केराची टोपली दाखवत आहेत ज्यामुळे बाजार समितीला मोठा आर्थिक फटका बसत आहे
-घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब वडदे यांनी सचिव जरे यांच्या कडे केली मागणी या अवैध व्यवसायावर कारवाई कधी होणार?
एपीएमसी न्यूज नेटवर्क:
मुंबई APMC भाजीपाला घाऊक मार्केटमधील अनधिकृत व्यापार, अतिक्रमण आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता झालेल्या पाहणीत उघड झालं. सचिव जरे यांच्या निर्देशांनंतर फळ व धान्य मार्केटमध्ये धडक कारवाई सुरु असली तरी भाजीपाला मार्केटमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्पष्टपणे जाणवले.
पाहणीत ६० टक्के व्यापार बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचं समोर आलं. मुख्य मार्ग, पॅसेज, धक्के—सगळीकडे अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि खुलेआम शेतमालाची विक्री. एका गाळ्यात चार–पाच जण बसून अवैध विक्री, तर काही व्यापारी गाळे भाड्याने देऊन धक्क्यावरच शेतमाल विकत आहेत.
कांदा–बटाटा–लसूणपासून महागड्या भाज्यांपर्यंत सर्व माल थेट धक्क्यावर परिसरात गुटखा विक्री, पॅसेजवर अंडा भुर्जीपाव सह अवैध खाद्यपदार्थांचे स्टॉल, फुटपाथवर LPG सिलिंडरचे उघड व्यवहार सुरू. या गैरव्यवहारामागे सुरक्षा अधिकारी आणि ठराविक व्यापाऱ्यांचा नेक्सस असल्याचा आरोप. रोज लाखोंची वसुली होते, पण हे पैसे नक्की जातात कोणाच्या खिशात हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे .त्यामुळे मार्केटच्या सुरक्षा धोक्यात आणणारे असे सुरक्ष्या अधिकाऱ्याना बोर्डात पाठवा आणि नवीन टीम आणा जेणेकरून मार्केट सुरळीत होईल.
घाऊक भाजीपला व्यापारी महासंघाच्या तक्रारीनंतर आता मार्केट उप सचिवाने जवळपास 50 ते 60 व्यापाऱ्याना नोटिस वाजवले पण अनधिकृत कारभारात घट नाही उलट उपसचिवांवर दबाव वाढल्याचे निदर्शनास येत आहे …..या बेकायदेशीर कारभारामुळे बाजार समितीचा महसूल घटतोय, शेतकऱ्यांचे नुकसान वाढतेय आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचा व्यापार अडचणीत आलाय. तसेच मार्केटमध्ये अस्वच्छता, सांडपाणी, दुर्गंधी—मार्केटची व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे…..भाजीपाला व्यापारी महासंघाची नवीन सचिवांकडे स्पष्ट मागणी आहे की सदर नेक्सस मोडा! धडक कारवाई करा! आणि भाजीपाला मार्केटला स्वच्छ, सुव्यवस्थित करा!जेणे करून मार्केट सुरळीत होईल.