Cabinet Decision :वाढवण ट्रान्सशिपमेंट बंदर ते समृद्धी महामार्गाला फ्रेट कॉरिडॉरने जोडण्यास मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

-भरवीर (नाशिक) येथे होणार थेट जोडणी
-प्रवास 4-5 तासांवरून फक्त 1.5 तासात
-2,528 कोटींचा प्रकल्प, 3 वर्षांत पूर्ण
-स्थानिक उद्योगांना गती, रोजगार वाढणार
-हा महामार्ग डहाणू, विक्रमगड, जव्हार, त्र्यंबकेश्वर, मोखाडा व इगतपुरीतून जाणार!
-आता महाराष्ट्र होणार लॉजिस्टिक हब!
मुंबई ,एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : वाढवण बंदर आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉरने जोडलं जाणार आहे.   नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे हा मार्ग जोडला जाईल. या द्रुतगती महामार्गास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येईल. प्रकल्पाकरता हूडकोकडून 1 हजार 500 कोटींचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह 2 हजार 528 कोटी 90 लाख रुपयांच्या तरतूदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. प्रकल्पाचे काम 3 वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.
वाढवण ट्रान्सशिपमेंट हे बंदर वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडच्या माध्यमातून बांधले जात आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागापर्यंत वेगाने व किफायतशीर किंमतीमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. हे पाहाता हे बंदर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा हा प्रस्ताव आहे. केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सागरमाला प्रकल्पांतर्गत सध्या वाढवण बंदर ते तवा पर्यंत 32 कि.मी. महामार्गाचे काम हाती घेतले आहे. 
समृध्दी महामार्गावरुन वाढवण बंदराकडे जाण्याकरीता भरवीर-आमणे (समृध्दी महामार्ग) ते वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. त्यामुळे जवळजवळ 82 कि.मी. लांबीचा अनावश्यक प्रवास करावा लागतो. वाढवण