मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची बैठक*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनी (MADC) के निदेशक मंडल की बैठक शिर्डी विमानतळाचा कुंभमेळ्यासाठी विस्तार तर अमरावती, कराड विमानतळ प्रकल्पांना गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची 91 वी बैठक पार पडली.बैठकीत शिर्डी, अमरावती, लातूर, कराड, चंद्रपूर व गडचिरोलीसह राज्यातील विविध विमानतळांच्या विस्तारीकरण व विकास कामांना गती देण्यावर भर देण्यात आला. कुंभमेळा, प्रादेशिक जोडणी योजना आणि हवाई सेवांची उपलब्धता लक्षात घेऊन विमानतळांमध्ये आधुनिक सुविधांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे 2 हेलिपॅड व 8 वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मान्यता दिली. अमरावती येथे वाढत्या औद्योगिक विस्तारामुळे धावपट्टी वाढवावी लागणार असून येथे महसूलवाढीच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
लातूर विमानतळाचा विकास करावा यामुळे बीड व धाराशिवसारख्या जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल, कराड येथील विमानतळाचा वेगाने विकास करून नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करावी. चंद्रपूर विमानतळावर चार्टर्ड विमानांसाठी धावपट्टी वाढविण्यात यावी आणि गडचिरोली विमानतळासाठी दोन-तीन पर्यायी जागांचा विचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यात सध्या प्रादेशिक जोडणी योजनेंतर्गत 16 मार्गांवर विमानसेवा सुरू असून 8 नवीन प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. यावेळी रत्नागिरी, अकोला, कोल्हापूर, नांदेड, धुळे आदी विमानतळांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.यावेळी उपमुख्यमंत्री ए.