Pune ACB Trap Case: सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेटसाठी तब्बल 8 कोटीच्या लाच घेताना पुण्यात दोघांना अटक
विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यांना लाचप्रकरणी अटक
उप निबंधकच्या नावावर दोघांनी लाच मागितल्याची माहिती
लाच प्रकरणाचे धागेदोरे सहकार विभाग ते मंत्रालयातपर्यंत?
देशातील सर्वात मोठी ACB कारवाई?
Pune ACB Trap Case: 
पुण्यातील अँटी करप्शन ब्युरोने (ACB) राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या लाच मागणीपैकी एक प्रकरण उघडकीस आणले आहे. तब्बल ८ कोटी रुपयांची लाच मागून ३० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लिक्विडेटर आणि ऑडिटरला रंगेहात पकडण्यात आले.
अटक केलेले
• विनोद माणिकराव देशमुख (वय ५०) – लिक्विडेटर, एकता सोसायटी
• भास्कर राजाराम पोळ (वय ५६) – ऑडिटर व माजी प्रशासक
घोटाळ्याची सुरुवात: ‘शेअर सर्टिफिकेट’ मिळवण्यासाठी ८ कोटींची मागणी!
धनकवडी येथील एकता सहकारी सोसायटी ही मागील काही वर्षांपासून वादात सापडलेली संस्था.नवीन व जुन्या सभासदांमधील वाद २०२० मध्ये सहकार विभागाकडे पोहोचला. चौकशीनंतर सोसायटीला लिक्विडेशनमध्ये पाठवण्यात आले आणि २०२४ मध्ये विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती झाली.
२००५ मध्ये सभासदत्व घेतलेल्या तक्रारदारांसह ३२ जणांनी शेअर सर्टिफिकेटसाठी २०२३ मध्ये अर्ज केला होता.तात्कालीन प्रशासक भास्कर पोळ याने ३२ जणांचे अर्ज निकाली काढले, मात्र तक्रारदाराचा अर्ज प्रलंबितच ठेवला.
सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदाराने चौकशी केली असता भास्कर पोळ याने धक्कादायक ‘डील’ सांगितली—
३ कोटी – शेअर सर्टिफिकेटसाठी (स्वतः व लिक्विडेटर देशमुखासाठी)
५ कोटी – सोसायटीच्या लिलाव प्रक्रियेत ‘हवी त्या व्यक्तीला’ जागा देण्यासाठी
एकूण ८ कोटींची लाच मागण्याचा उघड उघड प्रस्ताव तक्रारदाराला देण्यात आला.
ACB ची पडताळणी आणि सापळा
५ डिसेंबर रोजी तक्रार मिळताच ACB ने पहिल्याच दिवशी पडताळणी केली.
तपासात पोळ याने ३० लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून मागितल्याचे स्पष्ट झाले.
त्याच दिवशी पुण्यातील शनिवार पेठेत तक्रारदाराच्या कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला.
रंगेहात अशी पकड झाली
• लिक्विडेटर विनोद देशमुख प्रत्यक्ष भेटीस आला
• तक्रारदाराच्या कामासाठी ३० लाखांची ‘एन्ट्री’ निश्चित
• रक्कम स्वीकारताच ACB ने दोघांना वेढले
• देशमुख व पोळ दोघांना तात्काळ जागेवरुन अटक
सहकार विभाग पासून मंत्रालयापर्यंत धागेदोरे?
प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर: