CM Devendra Fadnavis | राज ठाकरेंची भेट, उद्धव ठाकरेंना फोन; फडणवीसांची राजकीय चहलपहल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
या भेटी व संवादामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुका व आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या या चहलपहलीला महत्त्वाचे मानले जात आहे.
राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात सविस्तर चर्चा झाली असून, त्यामध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत मतांची देवाणघेवाण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर उद्धव ठाकरेंशी झालेला संवादही राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे.
भविष्यातील आघाड्या, निवडणुकीतील रणनीती आणि महाराष्ट्रातील बदलते राजकारण याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे, असे राजकीय विश्लेषक मानत आहेत.