Onion Price update: शेतकऱ्यांच्या कांद्याला ₹४५-५०चा भाव, तरीही APMCत इजिप्तचा कांदा!
परदेशातून दोन कंटेनरमधून ६० टन कांदा दाखल आयात कांद्याला ₹३८-४० किलोचा दर
मुंबई APMCत इजिप्तचा कांदा दाखल शेतकऱ्यांच्या दरावर परिणाम होणार?
नवी मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत असतानाच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात इजिप्तमधून आयात केलेला कांदा दाखल झाला आहे. बुधवारी (३० सप्टेंबर) दोन कंटेनरमधून सुमारे ६० टन इजिप्तचा कांदा बाजारात दाखल झाल्याची माहिती आहे. या कांद्याला ३८ ते ४० रुपये किलो दर मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रातून मुंबई APMCच्या कांदा-बटाटा बाजारात १९,९५० गोणी कांद्याची आवक झाली. स्थानिक कांद्याची विक्री ४५ ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
स्थानिक कांद्याला तुलनेने चांगला दर मिळत असताना इजिप्तमधून कांदा आयात करण्याची आवश्यकता काय, असा सवाल शेतकरी प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. आयात कांद्याची आवक वाढल्यास बाजारातील पुरवठा वाढून स्थानिक कांद्याच्या दरावर दबाव येण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत असताना इजिप्तचा कांदा बाजारात आणण्यामागे नेमका उद्देश काय? तसेच या आयातीचा स्थानिक कांद्याच्या बाजारभावावर मोठा परिणाम होणार, आल्याची माहिती बाजारघटंकडून करण्यात आली   आहे.