दिशा कृषी उत्पन्नाची 2029 पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न.

-शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही -अजित पवार
पुणे: शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर निविष्ठा आदींचा खर्च कमी करणे तसेच उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करणे आता काळाची गरज आहे काळानुरूप शेतकऱ्याने देखील पीक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला दिशा कृषी उन्नतीची 2029 या पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश कला क्रीडामंच येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास कृषिमंत्री ॲड माणिकराव कोकाटे आमदार बापूसाहेब पाठारे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र प्रस्तुगी कृषी आयुक्त सुरज मांढरे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी कृषी संचालक रफिक नाईकवडी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने बँक ऑफ महाराष्ट्राचे देवदत्त रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी व्हाट्सअप चॅनलच्या क्यू आर कोड व सेवा दूत ॲप चे उद्घाटन देखील करण्यात आले याप्रसंगी अनेक संस्थांबरोबर सामंजस्य करार देखील करण्यात आला उपमुख्यमंत्री पवार म्हणाले आपल्या जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची बलस्थाने व पुणेवा ओळखून त्यावर वैज्ञानिक व व्यावहारिक उपाययोजनांचा पंचवार्षिक आराखडा तयार केला असून पन्नास कोटीची तरतूद देखील केली आहे पुरवणी मागण्यांमध्ये आणखीनिधीबाबतही विचार करण्यात येईल शासनाने एक रुपयात विमा योजना सुरू केली होती त्याचा अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला जरी असला तरी या योजनेचा गैरफायदा देखील घेतला गेला आहे त्यामुळे योजनेत बदल करून शेतकऱ्यांना देखील योग्य ती समज दिली जाणार आहे
शेती समोर बदलते हवा मान दुष्काळ घटत चाललेले शेतीचे आकारमान या समस्या आहेत तरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी खचू नये राज्य शासन वाऱ्यावर सोडणार नाही असा आत्मविश्वास देखील त्यांनी दिला
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले सर्व विभागातील शेतकरी प्रगतशील शेतकरी महिला शेतकरी आदींची संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन अनेकविध प्रयोग अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत राज्याची सध्याची कृषी निर्यात 100 कोटी वरून 50 हजार कोटींवर कशी जाईल शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे अधिकाधिक तरुण शेतीकडे वळायला हवा कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे आहे त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे त्यासाठी एक ॲप देखील तयार केले असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा
दिशा कृषी उन्नतीची 2029 हा पंचवार्षिक आराखडा राबविला असून जिल्ह्यात निर्यातक्षम पिकांचे क्लस्टर करण्यात येणार असून कृषी यांत्रिकीकरण अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत व उत्पादनात वाढ निर्यात साखळी तयार करणे असे उद्दिष्ट आहे येत्या एक ते तीन जून दरम्यान ॲग्री हे केथॉन राबवण्यात येणार असून येणारे तंत्रज्ञान एक जून पासून प्रत्यक्ष शेतीमध्ये राबवण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले या कार्यक्रम प्रसंगी कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या उद्योग संघटना कंपन्या व महाराष्ट्र बँक आदी संस्थांशी सामंजस्य करार देखील करण्यात आला