केंद्राचा मोठा दिलासा! मका खरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढली 50 हजार मेट्रिक टनांची अतिरिक्त खरेदी मंजूर
- मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या पाठपुराव्याला यश पंतप्रधान Narendra Modi व केंद्रीय मंत्री Pralhad Joshi यांचे मानले आभार
एपीएमसी न्यूज नेटवर्क:
खरीप हंगामातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मका खरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढविण्यासोबतच आधी निश्चित केलेल्या 66,000 मेट्रिक टनांच्या मर्यादेत आणखी 50,000 मेट्रिक टनांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण खरेदी मर्यादा 1,16,000 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे विशेष विनंती केली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढ आणि अतिरिक्त खरेदीस मंजुरी दिली.
या निर्णयामुळे बाजारातील दरांवरील दबाव कमी होऊन शेतकऱ्यांना हमीभावाने मका विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः ज्या भागात मका उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे, त्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान Narendra Modi आणि केंद्रीय मंत्री Pralhad Joshi यांचे आभार मानले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
@narendramodi @Dev_Fadnavis @JoshiPralhad
#Maharashtra #DevendraFadnavis #Farming