मुंबई APMC मसाला मार्केटच्या E-विंगमध्ये धोक्याची घंटा, अनधिकृत कोल्ड स्टोरेजमुळे आग?
मुंबई APMC मसाला मार्केटच्या E-विंगमध्ये धोक्याची घंटा अनधिकृत कोल्ड स्टोरेजमुळे आग?
-ड्रायफ्रूट मार्केट ‘फायर ट्रॅप’ पोटमाळे, जनरेटर आणि उघड्या वायरमुळे वाढला धोका
APMCच्या E-विंगमध्ये अतिक्रमणांचा स्फोट प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
कोट्यवधींच्या ड्रायफ्रूट मार्केटमध्ये सुरक्षेचा बोजवारा स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटची मागणी
अनधिकृत बांधकामांसाठी लाखोंची देवाणघेवाण? E-विंगमधील आगीने उघड केला गंभीर प्रकार
मुंबई APMC अतिक्रमण पथक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
मुंबई APMCच्या मसाला मार्केटमधील E-विंगमध्ये शनिवारी दुपारी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर संपूर्ण ड्रायफ्रूट मार्केटमधील अनधिकृत बांधकामे, कोल्ड स्टोरेज आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गाळा क्रमांक E-12 मधील पोटमाळ्यावर लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.
प्राथमिक माहितीनुसार, पोटमाळ्यावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत कोल्ड स्टोरेजच्या कॉम्प्रेसरने पेट घेतल्याने आग लागली आहे अशी माहिती समोर येत आहे. पुठ्ठे, जुने साहित्य आणि पॅकिंगसाठी वापरले जाणारे ज्वलनशील साहित्य यामुळे धूर मोठ्या प्रमाणात पसरला. घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथून पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तत्काळ कामगारांना बाहेर काढत आग विझवण्याचे काम हाती घेतले.
मात्र या घटनेनंतर E-विंगमधील अनधिकृत बांधकामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मसाला मार्केटमधील E-विंग हे ड्रायफ्रूट मार्केट म्हणून ओळखले जाते. येथे एकूण ६२ गाळे असून केवळ १७ व्यापाऱ्यांनाच अधिकृत किरकोळ व्यापाराची परवानगी आहे. सर्वात जास्त उलाढाल याच विंग मध्ये आहे . या विंग मध्ये बहुतांश गाळ्यांमध्ये अनधिकृत पोटमाळे उभारण्यात आल्याचा आरोप बाजार घटकांकडून केला जात आहे.
सील कारवाई निवडकच?
सध्या E-20 आणि H-18 या गाळ्यांवरील बांधकामे APMC प्रशासनाने सील केली आहेत. मात्र बाजूला 
E-21 गाळ्यात RCC बांधकाम करण्यात आले आहे.या RCC बांधकाम शॉटर बंदकरून करण्यात आली आहे . या बांधकामाला   परवानगी कोणी दिली यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.सध्या फिनिशिंगच्या काम सुरू आहे .अतिक्रमण पथक अद्याप कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उघड्या वायर, पॅसेजमध्ये दुकाने ग्राहकांच्या जीवाशी खेळ
E-विंगमध्ये प्रवेश करताच अनेक ठिकाणी विद्युत वायर उघडपणे पॅसेजमध्ये   दिसतात. याशिवाय व्यापाऱ्यांनी गाळ्यांसमोर अनधिकृतपणे सुकामेवा, फरसाण आणि प्लास्टिक साहित्याची दुकाने थाटल्याने पॅसेज अरुंद झाले आहेत. ग्राहकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
याचबरोबर काही गाळेधारकांनी पॅसेजवर एक ते दोन मजली अनधिकृत बांधकामे उभारून ती भाड्याने दिल्याचेही समोर येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनरेटर, कोल्ड स्टोरेज आणि प्रोसेसिंग युनिट्स सुरू असल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“सेस नाही, तरी सुविधा का?”
रस्ते, ड्रेनेज लाईन, शौचालये आणि सुरक्षा सुविधा APMC प्रशासनाकडून कोट्यावधी रुपयांची खर्च वर्षात केली जाते. आणि ही सुविधा पुरवल्या जात असल्या तरी या विंगमधून बाजार समितीला अपेक्षित सेस मिळत नाही .”आमदानी आठणी खर्च रुपया” त्यामुळे “महसूल मिळत नसताना प्रशासन या विंगवर एवढे मेहरबान का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वारंवार लागणाऱ्या आगींमुळे भीती
E-विंगमध्ये यापूर्वीही अनेकदा आगीच्या घटना घडल्या आहेत. या भागात परदेशातून आयात होणारा कोट्यवधी रुपयांचा सुकामेवा साठवला जातो. सणासुदीच्या काळात येथे प्रचंड गर्दी असते. मात्र त्यानुसार अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन सुविधा नसल्याने बाहेरून येणारे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटची मागणी
E-विंगमधील वाढती गर्दी, अनधिकृत पोटमाळे, कोल्ड स्टोरेज, जनरेटर आणि प्रक्रिया युनिट्स लक्षात घेता संपूर्ण विंगचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी बाजार घटकांकडून होत आहे. बाजार आवारात सध्या १५ ते ३० कोल्ड स्टोरेज आणि १० ते १२ बदाम फोडण्याचे कारखाने   अनाधिकृतपणे सुरू आहे यावर मार्किट संचालक यांच्या पाठिंबा असल्याची बोलले जात आहे.
“अनधिकृत बांधकामांसाठी लाखोंची देवाणघेवाण?”
एका गाळ्यात अनधिकृत बांधकामासाठी मार्किट संचालक ,Apmc प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना ५ ते १० लाख रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोपही बाजारात चर्चिला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण पथक तयार करून सुद्धा कारवाई होत नाही.महत्वाचे बाब अशी आहे की ज्या विंग मध्ये सर्वात जास्त अतिक्रमण आहे त्या ठिकाणी मार्किट संचालक यांच्या गाळे देखील आहेत.त्यामुळे या व्यवहारात संचालक सहभाग असल्याचेही बोलले जात आहे.
यामुळे आता NMMC आणि APMC प्रशासनाने संयुक्तपणे संपूर्ण ड्रायफ्रूट मार्केटमधील अनधिकृत बांधकामे, अग्निसुरक्षा आणि विद्युत व्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी जोरदार मागणी बाजार घटकांकडून केली जात आहे.