धक्कादायक; मुंबई APMC कांदा बटाटा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची 1 कोटी 60 लाखांची फसवणूक ,हक्काची पैसे मिळणार कधी ?

APMC कांदा बटाटा व्यापाऱ्यांकडून 43 शेतकऱ्यांना दीड कोटींचा गंडा
मार्केट संचालक यांच्या व्यापाऱ्यावर छुपा पाठिंबामुळे शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळत नाही अशी आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे
नवी मुंबई : मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये   अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 43 शेतकऱ्यांकडून मागील चार वर्षापासून   मालधनी तक्रार करण्यात आली आहे, यामध्ये चालू वर्ष २०२४-२५ पर्यंत   १ कोटी ९६ लाख रुपये शेतकऱ्यांची थकबाकी होती, मात्र बाजार समिती प्रशासनतर्फे सुनावणी साठी ४ वर्ष लागली आणि   सुनावणीनंतर शेतकऱ्यांना ९० लाख देण्यात आले आहे .आता शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपये देणे बाकी आहे. महत्वाचे बाब अशी आहे की ज्यावेळी शेतकरी बाजार समितीमध्ये आपल्या शेतमालाची थकीत रक्कम घेण्यासाठी येतात, त्यावेळी संबंधित व्यापारी मार्केट संचालकांकडे जातात व ते संचालक व्यापाऱ्यांच्या   बाजूने निर्णय घेऊन त्या शेतकऱ्यांना तारीख पे तारीख देतात …त्यामुळे काही शेतकरी कंटाळून मार्केटमध्ये येणे सोडून देतात. यामुळे बाजार समितीमध्ये आपला शेतमाल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान करून मार्केट संचालक त्या व्यापाऱ्यांना फायदा मिळवून देण्याचा उद्योग मुंबई Apmcमध्ये करत असल्याचे दिसून येत आहे .
एकीकडे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे मुंबई   एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. मागील 3 वर्षापासून मार्केटमध्ये काही अडत व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. महत्वाचे बाब अशी आहे की कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे या अडत व्यापाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना परत मार्किट मधे व्यापार करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे .सूत्राने सांगितले प्रमाणे या प्रकरणात मार्किट संचालक यांच्या छुपा पाठिंबा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळत नाही.
गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील महेंद्रकुमार पटेल यांनी मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटमधील रामचंद्र पडवळ आणि कंपनी यांच्या गाळा क्र. H -220 यांच्याकडे बटाटा शेतमाल 10 फेब्रुवारी 2025 रोजी 200 गोणी, 11 फेब्रुवारी 2025 रोजी 500 गोणी, 3 मार्च 2025 रोजी 230 गोणी, 11 मार्च 2025 रोजी 231 गोणी, 13 मार्च 2025 रोजी 218 गोणी पाठविण्यात आला होता. त्याप्रमाणे व्यापाऱ्यांकडून या बटाटा शेतमालाचे रक्कम रुपये 6 लाख 87 हजार 681 शेतकऱ्यांना देणे आहे. मात्र व्यापारी सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत. 
तर इंदोर मधील शेतकरी भोजराज बनारशी यांची देखील रक्कम रुपये 21 लाख 92 हजार 334   इतकी रामचंद्र पडवळ आणि कंपनी गाळा क्र. h-220 यांच्याकडून बटाटा शेतमालची थकबाकी मिळालेली नाही. अशाप्रकारे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. अनेक शेतकऱ्यांना तक्रार प्रक्रिया माहित नसल्याने कित्येक शेतकऱ्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या जीवावर चालणारे   व्यापारी   भव्य चारचाकी गाडी घेऊन बाजार आवारत फिरतात मात्र, काबाडकष्ट करून शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याला वायावर सोडतात .त्यामुळे बाजार समिती ही नक्की शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच चुकीचे काम करणाऱ्या काही व्यापाऱ्यामुळे प्रामाणिकपणे व्यापार करणारे व्यापारी व बाजार समितीचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे बाजार समितीमधून या संचालक मंडळाला हद्दपार करण्याची मागणी काही प्रामाणिक व्यापारी व शेतकरी करत आहेत.