मार्केट यार्डात वारकऱ्यांचे भक्तिभावाने स्वागत: दोन दिवस भक्तीमय उत्सव

वारकऱ्यांचे भक्तिभावाने स्वागत! पुणे मार्केट यार्डात दोन दिवस भक्तिमय उत्सवाचा माहोल
सुमारे 15 हजार वारकऱ्यांना चहा-पाणी, अल्पोपहार, भोजन, स्वच्छतागृहे आणि निवासाची उत्तम सोय
पुणे, एपीएमसी न्यूज़ नेटवर्क :
सालाबादप्रमाणे यंदाही संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यातील मार्केट यार्डमधील गुळ व भुसार विभागात भावपूर्ण स्वागत करण्यात आले. सुमारे १५ हजार वारकऱ्यांना चहा-पाणी, अल्पोपहार, भोजन, स्वच्छतागृहे आणि निवासाची उत्तम सोय करण्यात आली.
या सेवेत मे. राजेंद्रकुमार मोहनलाल आणि कं., मे. चेनसुखलाल माणिकचंद, मे. नविन पेढी, मे. आकाश मार्केट, मे. ओस्तवाल अॅग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि., मे. चंद्रकांत मुथा, मे. गजानन ट्रेडिंग कंपनी, मे. धनलक्ष्मी ट्रेडर्स, मे. बालाजी सेल्स, मे. मांडोत ब्रदर्स, मे. पारख अँग्रो इंडस्ट्रीज आदी सुमारे ४० दुकानांनी पुढाकार घेतला.
दुकानदार, कर्मचाऱ्यांनी मनापासून सेवा करत वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत केले. यासोबतच आरोग्य तपासणी, मोफत औषधवाटप, स्वच्छता, औषध व पावडर फवारणी, पाण्याचा मुबलक पुरवठा, लाईट्स, मोबाईल टॉयलेट्स आणि कचरा व्यवस्थापन या बाबींचीही योग्य सोय बाजार समिती आणि व्यापाऱ्यांतर्फे करण्यात आली.
वारकऱ्यांना रेनकोट, खाद्यान्न, पाण्याच्या बाटल्या, कपडे, आर्थिक मदतीसारख्या वस्तूंही पुरविण्यात आल्या. संपूर्ण परिसर दोन दिवस भक्तीमय झाला होता.
दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे अनेक वर्षांपासून सेवा करणाऱ्या व्यापाऱ्यांचा गौरव करत, कार्यकारिणी सदस्यांनी प्रत्यक्ष दुकानी जाऊन त्यांचा सन्मान केला. याबाबत चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी समाधान व्यक्त केले.