रखडलेल्या मसाला मार्केट पुनर्विकासाला गती: २७२ कार्यालयांसाठी एकमुखी मंजुरी

रखडलेल्या पुनर्विकासाला गती! मसाला मार्केटच्या मध्यवर्ती सुविधा इमारतीच्या पुनर्बांधणीस सर्वसहमतीने मंजुरी
-मसाला मार्केटमधील मध्यवर्ती   सुविधा इमारतींच्या २७२ कार्यालय धारकाचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा
नवी मुंबई | एपीएमसी न्यूज़ नेटवर्क 
मागील अनेक वर्षांपासून रखडलेला मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव अखेर सर्वसहमतीने मंजूर झाला आहे. महापालिकेने सदर इमारत अतिधोकादायक जाहीर केल्यानंतर, १८ जून रोजी पाणी व वीज पुरवठा थांबवण्यात आला. या पार्श्वभूमीवर १९ जून रोजी पाम बीच मॉल, वाशी येथील सभागृहात तातडीची व्यापारी आणि कार्यलयधारकाची बैठक पार पडली, ज्यात बहुसंख्य कार्यालय धारकांनी पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला संमती दर्शवली. या बैठकीत संचालक विजय भुत्ता, मोहन गुरनानी, अशोक जैन, दीपक शाह, अमरीशलाल बारोट आदींसह अनेक प्रमुख गाळाधारक उपस्थित होते.
या बैठकीत २७२ कार्यालयधारकांपैकी १८० पेक्षा अधिक गाळाधारक उपस्थित होते. बहुमताच्या आधारावर पुनर्बांधणीचा प्रस्ताव एकमुखाने संमत करण्यात आला.
इमारतीची दुरवस्था, नव्या विकासाची गरज
मसाला मार्केटमधील ही इमारत गेल्या काही काळापासून डागडुजी अयोग्य स्थितीत होती. वारंवार मागणी करूनही निर्णय रखडत होता. मात्र महापालिकेच्या अहवालानंतर वीज व पाणी बंद झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे पुन्हा कोणतीही अडचण न येता इमारतीच्या सुरक्षित व आधुनिक पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंगचे अध्यक्ष्य उत्तम भणगे यांनी दिली आहे .
नव्या आराखड्याचे वैशिष्ट्ये:
•प्रत्येक गाळाधारकास १०० स्के.फूट अधिक जागा
•प्रत्येकासाठी वाहन पार्किंगची हमी
•Urban Analysis ही संस्था प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त
संचालक मंडळाची मंजुरी
या निर्णयानंतर, प्रस्ताव अधिकृतपणे पुढील संचालक मंडळाच्या सभेत सादर केला जाणार असून, तिथे अंतिम मंजुरीनंतर पुनर्बांधणीची कार्यवाही वेगाने सुरू होणार आहे.
– महेश साळुंखे-पाटील, उपसचिव, मसाला मार्केट