मुंबई APMC नालेसफाई घोटाळ्याची दुर्गंधी!

▶️मुंबई APMC नालेसफाई घोटाळ्याची दुर्गंधी! विभागीय चौकशी सुरू असतानाही घनकचरा ‘उप सचिव’ पदासाठी हालचाली एपीएमसीच्या प्रशासनावर शाखेवर संशयाची साया  
▶️‘मला घनकचरा उप सचिव करा’ स्वच्छता अधिकारी किरण घोलपने   केला एपीएमसी प्रशासनाकडे मागणी?  
▶️सध्या मुंबई APMC मधे नवीन धोरण सुरू आहे भ्रष्टाचार करा पदोन्नती घ्या  
नवी मुंबई : मुंबई APMC कांदा-बटाटा आणि मसाला मार्केट परिसरातील नालेसफाई घोटाळा प्रकरण आता अधिकच गहिरे झाले असून, विभागीय चौकशीच्या कचाट्यात अडकलेले स्वच्छता अधिकारी किरण घोलप यांनी ‘उप सचिव’ पदासाठी हालचाली सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC) आस्थापना शाखेच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.   नाले नाहीत, तरीही लाखोंची सफाई!   कांदा बटाटा व मसाला मार्केट परिसरात प्रत्यक्षात नालेच नसताना देखील दरवर्षी पावसाळ्यापूर्वी “नालेसफाई”च्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढण्यात आली. संबंधित ठेकेदारांना या माध्यमातून लाभ देण्यात आल्याचा आरोप असून, बाजार समितीच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडल्याचे बाजार घटकांचे म्हणणे आहे.   दोन शौचालयांचा संशयास्पद ‘हस्तांतर’   शौचालय घोटाळा चौकशी सुरू असतना भाजीपाला व फळ मार्केटमधील दोन शौचालये व्यापारी संस्थेकडे परस्पर हस्तांतरित झाल्याचा प्रकारही उघडकीस आला होता . या प्रकरणीही स्वच्छता अधिकारी किरण घोलप यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू आहे.   विभागीय चौकशी सुरू, तरीही ‘उप सचिव’ पदासाठी प्रस्ताव!   ताज्या घडामोडींमध्ये, 17 जून रोजी पार पडलेल्या सेवक समितीच्या बैठकीत घोलप यांना उप सचिवपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव आस्थापना शाखेकडून ठेवण्यात आला होता. मात्र, संचालकांनी त्याला स्पष्ट नकार दिला. तरीही या प्रस्तावाच्या मुळात कुणाचा आदेश होता, याचा खुलासा अद्याप झाला नाही. त्यामुळे आस्थापना शाखेच्या पारदर्शकतेव