मुंबई APMCमध्ये आज 640 गाड्यांतून 56 प्रकारच्या भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या आजचे बाजारभाव
Apmc Vegetable Price Update : राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये आज 640 गाड्यांतून 56 प्रकारच्या भाजीपाल्याची तब्बल 25 हजार क्विंटल आवक झाली. बाजारात विविध भागांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला दाखल झाला असून, काही भाज्यांच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळत आहे.
आजच्या बाजारभावात आले बेंगळुरूला कमाल 150 रुपये किलो, तर आले साताऱ्याला कमाल 140 रुपये किलो भाव मिळाला. आवळा 110 ते 130 रुपये, वाटाणा 50 ते 70 रुपये, गवार 50 ते 80 रुपये आणि भुईमूग शेंग 70 ते 110 रुपये किलो या दराने विकली गेली.
दुसरीकडे, फ्लॉवर 10 ते 20 रुपये, गाजर 20 ते 30 रुपये, भेंडी 24 ते 30 रुपये, काकडी 16 ते 20 रुपये आणि टोमॅटो नंबर 1 ला 15 ते 20 रुपये किलो बिकला जात आहे .
आज कोणती भाजी किती रुपयांना?
* वांगी : 20 ते 25 रुपये किलो
* काकडी : 15 ते 20 रुपये किलो
* भेंडी : 30 ते 40 रुपये किलो
* गाजर : 20 ते 25 रुपये किलो
* कोथिंबीर : 12 ते 15 रुपये किलो
* मेथी : 12 ते 20 रुपये किलो 
* आवळा 110 ते 130 रुपये किलो 
* पालक : 15 ते 20 रुपये किलो
* शेपू : 35 ते 50 रुपये किलो
* कडीपत्ता : 20 ते 25 रुपये किलो
* मिरची : 50 ते 80 रुपये किलो
* टोमॅटो : 15 ते 20 रुपये किलो
* गवार : 30 ते 35 रुपये किलो
* कोबी : 15 ते 20 रुपये किलो
* फ्लॉवर : 15 ते 20 रुपये किलो
* फरसबी : 70 ते 80 रुपये किलो
* वाटाणा : 80 ते 110 रुपये किलो
* भुईमूग शेंगा : 70 ते 110 रुपये किलो
* आले : 100 ते 150 रुपये किलो
* लिंबू : 22 ते 42 रुपये डझन
* परवर : 60 ते 70 रुपये किलो
* पडवळ : 30 ते 45 रुपये किलो
पालेभाज्यांमध्येही दरात फरक
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर 12 ते 15 रुपये, मेथी 12 ते 20 रुपये, पालक 15 ते 20 रुपये आणि शेपू 35 ते 50 रुपये किलो असा दर आहे. तर कडीपत्त्याला 20 ते 25 रुपये किलो भाव मिळत आहे.
कोणत्या भाज्या महाग?
आजच्या घाऊक बाजारात वाटाणा सर्वाधिक 110 रुपये किलोपर्यंत, आले 110 रुपये, मुळा 50 रुपये, शेपू 50 रुपये, फरसबी 80 रुपये आणि भुईमूग शेंगा 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत.
टोमॅटोची मोठी आवक
आजच्या बाजारात टोमॅटोचीही मोठी आवक झाली आहे. बाजारभाव अहवालात टोमॅटोच्या विविध प्रकारांची नोंद असून, टोमॅटो नंबर 1 साठी 15 ते 20 रुपये किलो आणि नंबर 2 साठी 10 ते 14 रुपये किलो असा घाऊक दर नोंदवला आहे.
एकूण चित्र पाहता, मुंबई APMCच्या भाजीपाला बाजारात आज 640 गाड्यांमधून 25 हजार क्विंटलहून अधिक माल दाखल झाला असून, ग्राहकांसाठी बाजारातील घाऊक दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात नियंत्रण नसल्याने दुपट ते तिप्पट दराने विक्री केली जात आहे .